Wednesday, June 1, 2016

प्रेम लग्न आणि गोंधळ ! भाग २

आता आपल्याकडे २ पर्याय उरले आहेत फक्त
कुठले ग?
पहिला पळून लग्न करणे,ते सैराट पिक्चर मध्ये केले होते न त्यांनी तसे पळून जावू, किंवा आत्महत्या करणे , कारण तू सांगितले तसे घरच्यांच्या मर्जीने मी लग्न नाही करू शकत , तुझ्याशिवाय तरी मी जगू शकत नाही,ते चुकत आहे, आपण नाही ...मग का म्हणून मी त्याचा विचार करावा ?आणि मला शक्य नाही, तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचा विचारच करू शकत नाही .
(माझ्या मनाला जरासा दिलासा मिळाला की , इतके जीवापाड प्रेम करते कुणीतरी माझ्यावर )
मी म्हटले, चल दोन्ही पर्यायावर बोलू ,त्यानंतर मी तिसरा अजून एक पर्याय आहे तो सांगतो त्यावर विचार करू , जर हे दोन चुकीचे आहेत असे तुला पटले तरच ....
तर पळून लग्न करणे ?
तुला भाऊ पण नाही,त्यामुळे धोका तसा नाही काही ,हा हा
मला एक सांग ग ,मागच्या वेळेस तुझी लहान बहिण रात्री २ वाजता पार्टी करून आलेली आणि त्यावर तू आणि तुझ्या घरचे,तिच्यावर खूप चिडले होते,का?
ती म्हणाली कारण ते चुकीचे होते .
ते तुमच्या दृष्टीकोनातून चुकीचे होते तिच्या नाही ,आणि तू तुझा दृष्टीकोन, विचारसरणी तिच्यावर थोपवायचा प्रयत्न केलासच ,बरोबर ना ?
अरे पण काळजी वाटते म्हणून बोलली होती तिला ,इतक्या रात्री अपरात्री घरी येणे ,काही झाले तर ?
Exactly, now we are on the point,काळजी
तुझ्या घरच्यांना तुझी काळजी वाटते तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ते विरोध करताय ,तू माझ्यासोबत आनंदी नाही राहू शकणार असे त्यांना वाटत असेल म्हणून विरोध करताय ते ...हा त्यांचा दृष्टीकोन आणी ....तुला वाटते तू माझ्या सोबत आनंदी राहू शकतेस हा तुझा दृष्टीकोन ...
ती बोलली अरे पण ते विरोध करताय मग आपण विरोध केला तर काय बिघडले ?
अग ते आपल्याला समजून घेत नाही आहेत ते चुकत आहेत म्हणून आपण पण चुकायचे का?
मग त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय उरणार ग?आणि शेवटी कुणाला दुखावून आपण आपला स्वार्थ पाहणे हे प्रेम तर नाही ना?गेले २५ वर्ष त्यांनी जे प्रेम दिले , आपल्यासाठी जे केले आहे ,हे सर्व ,ते आपल्या नात्याला विरोध करताय म्हणून लाथाडून द्यायचे का ?
ती विचारात पडली ,मग आत्महत्या करायची ?
चल यावर बोलू आता ,
आत्महत्या करायची ?चल करूया ,मग काय ?
ती म्हटली मग काय म्हणजे ?
बर असे समज आपले लग्न झाले ,आणि नंतर एखाद्या गोष्टीवर आपले मत वेगळे असले ,आणि त्यातले एक करणे गरजेचेच असले ,आणि मी जर म्हटले की मी म्हणतोय तसेच करू ?तर तेंव्हाही आत्महत्या करशील का ?
अरे असा कसा बोलतोय तू ,तुला माझ्यावर विश्वास नाही का ?
अग एक उदाहरण दिलेय ,आपल्या घरच्यांनी यासाठी लहानाचे मोठे केलेय का ?,एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असली तर आत्महत्या करायची ? आपल्यावर जवाबदारी आहे त्यांची,आपल्याला लहानाचे मोठे करताना कित्येकदा मनाला मारून आपल्याला हवे ते दिलेय त्यांनी ,कित्येक रात्री आपल्या काळजीपोटी जागून काढल्या आहेत ,आणि इतक्याश्या कारणासाठी सर्व विसरून आत्महत्या करायची ?
ती चिडली ,इतके से कारण ?तुला हे इतकेसे कारण वाटत आहे ,माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ?
मी हसलो ,हो फार छोटा विषय आहे हा ,आणि या साठी मला ,तुझ्या व माझ्या घरच्यांना वाऱ्यावर सोडणे नाही पटत ..
ती बोलली ,मग काय करायचे काय आपण ...
मी शांतपणे बोललो , हे बघ त्यांच्यात आणि आपल्यात फक्त एका गोष्टीला घेवून मतभेद आहे ,ते म्हणजे आपले नाते , आणि या एका मतभेदामुळे ,आपण त्यांना वाईट समजणे ,त्यांच्या चांगल्या गुणांना दुर्लक्ष करणे ,त्यांना सोडून जाने योग्य नाही ,आपण त्यांचा गैरसमज दूर करूया ना ...
अरे अजून किती दिवस दूर करायचा मागची ५ वर्ष प्रयत्न करतच आहोत कि ?
मी म्हटले , अग प्रेमासाठी जीव द्यायला तयार होतो ना आपण ?
मग अख्खे आयुष्य प्रयत्न का नाही करू शकत ?अख्खे आयुष्य लढू का नाही शकत? एकमेकांची वाट का नाही पाहू शकत?
ते दुसर्यांशी लग्न कर म्हणून मागे लागतील ,आपण न चिडता सांगू ,कि आम्हाला नाही करायचे ,जात ,पैसा हे कारणे सोडून ,एकदा माणूस म्हणून विचार करा आमचा आणि सांगा कि समोरचा योग्य आहे का नाही ? माहिती काढा ,भेटून बघा बोलून बघा ,कुठे जरी वाटले कि माणूस म्हणून समोरचा चुकीचा आहे तर तुम्ही म्हणाल तिथे लग्न करू ..सोप्पे आहे ग मेल्यापैक्षा तरी हे ..
अरे तुला माहिती आहे माझ्या घरचे कसे आहेत ,नाही ऐकणार ते कधीच ..आणी तू म्हणतोस तसे केले तरी त्यांना त्रास हा होणारच ना ?
मान्य आहे त्रास होईल ,पण आपण पळून लग्न केल्यावर किंवा मेल्यावर जेवढा त्रास होईल त्या तुलनेत कमीच असणार ना ,त्रास आपल्याही होईलच की ...
प्रेम कुणाला दुखावणे शिकवत नाही ,प्रेम स्वार्थी बनवत नाही ग ,
प्रेम लढायला शिकवते, कुणाला दूर न करता कुणाला न दुखावता लढत राहू की ...
"आणि पळून लग्न करणे ,आत्महत्या करणे ,किंवा,आपल्या मनात नसताना घरच्यांच्या मर्जीने लग्न करणे या वाईट प्रथा मोडून काढूया ना .."
कसा वाटतो हा पर्याय ?
ती हसली आणि मिठी मारत बोलली ,तुझ्यासारखाच आहे ..
चल लढून पाहू ,देव सोबत आहे म्हटल्यावर कसली चिंता ...
अग शिकली कि बोलायला तू पण ...
उदास पायाने आलेलो दोघे ,हसऱ्या वाटेने लढायला निघालो मग ...
बस बाकी काही नाही
नि :शब्द(देव) 

No comments:

Post a Comment