उद्यापासून ऑफिस जॉईन करतेय मी ,अजून सुट्ट्या नाही मिळणार मला ,आणि खूप बोर पण होतेय ,
अग हे काय नवीन आता , बाळ ४ महिन्याचे आहे फक्त,तिला सोडून कसे काय जाणार ?
आहेत न सासू बाई आणि सासरे ?
अग पण बाळ ४ महिन्याचे आहे फक्त ,तिला काय हव काय नको हे तिला सांगता पण येत नाही ,आणि अश्या परिस्थिती मध्ये कसे काय सोडू शकतेस तिला एकटीला ?तिला भूक लागली आणि तू ऑफिस मध्ये असलीस तर ?
काय त्यात बॉटेल चे दुध देतील की सासूबाई , माझ्या सोबतच्या कलीग आहेत त्यांनीही असेच केले होते ?आणि शेवटी मला माझे करिअर पण पहावे लागेल ना ?
(माझ्या घुटन्यातली मस्तकात गेली ,)
हे बाळाचे प्लान करत होतो तेंव्हाच सांगितले असतेस तर बरे झाले असते ? बाळ होवूच दिले नसते मी ,तुझे करिअर माझे करिअर ,करिअर करिअर खेळत बसलो असतो जिंदगीभर ,आणि आधी ठरले होते न आपले की बाळ झाल्यावर मी तुला Ph.D ला प्रवेश घेवून देईल ,उच्च शिक्षणासाठी कोलेज हि सुट्ट्या मंजूर करते ,तुझे शिक्षण ही होईल आणि मुलीकडे लक्ष देणे हि होईल ,मग अचानक आता का बदलले तुझे मन ?

मला करमत नाही घरी ,आणि शेवटी २ वर्ष मी जोब न करता राहू शकत नाही ..
जोब न करता राहू शकत नाहीस ? जोब साठी मुलीशिवाय राहशील पण ,व्वा रे तुमच्या करिअरची ,
ओरडू नकोस तू राहा न तुझी जॉब सोडून मुलीसोबत इतकेच आहे तर , पुरुषी अहंकार भरलाय सर्व , आम्ही स्त्रियानीच करायचे का adjust नेहमी ...
पुरुषी अहंकार ? अग मुलीला भूक लागल्यावर मी तिला पाजू शकत नाही ,देवाने हे गिफ्ट तुम्हाला दिलंय आम्हाला नाही ,याचीच खंत वाटते ,देवाने मला प्रेग्नंट केले असते अन मला स्तन दिले असते तर मी थांबलोच असतो माझ्या मुलीजवळ , मला माझ्या मुली पेक्षा पैसा किंवा करिअर म्हत्वाचे नाही आहे ,आणि या वयात बाळाला आईची गरज जास्त असते म्हणून म्हणत आहे ,निसर्गाने ते वरदान तुम्हाला दिलेय त्याचा योग्य वापर तरी करा ,पुरुषी अहंकार म्हणे ? साला कुठली गोष्ट कुठे न्यायची ...
हो का ? मी थांबलो असतो म्हणे , बोलणे सोप्पे असते करणे नाही ,मी माझे करिअर दाववर नाही लावू शकत
करिअर च्या आईची ...काय असते हे करिअर आणी कश्यासाठी ? पैसा ? की मी इतके शिकले आहे म्हणून घरी कसे थांबायचे हे ?अरे त्या बाळाचा विचार कर ,माझ्या पगारावर ही आपण सुखात राहू शकतो , तआपल्या मुलीला कितीचा पाळणा आणला कितीचे गिफ्ट आणले याच्याशी काही घेणे देणे नाही ,तिला हे काही कळतच नाही ,तिच्यासाठी आपणच खेळणे आहोत सर्वात जवळचे , तिला आपला स्पर्श हवाय ,आपले प्रेम हवे आहे ,तिला भूक लागली की ती रडते याचा अर्थ ती बंड करतेय तो वेळेच्या वेळीच आपल्या प्रेमाने आपण नाही क्षमवला तर आपल्या आई बाबा होण्याला काही अर्थ उरणार नाही, आपण शिक्षण जॉब करण्यासाठी घेतले आहे असा गैरसमज का होतो लोकांना काय माहित ,शिक्षण फक्त नोकरी करण्यासाठीच घेतो का आपण ?दुसरा फायदा नाह्यी शिक्षणाचा ?आपण शिक्षण एक चांगले आयुष्य जगायला घेतो ,बरे वाईट यातला फरक समजण्यासाठी घेतो ,आपल्यासाठी आणि समजासाठी त्याचा योग्य वापर करता यायला हवा या साठी घेतो ...करिअर हा शब्दच साला फार्स आहे ,आपल्या जवाबदार्या टाळून पळून जाणे याला करिअर म्हणतात ...
तू जास्त बोलतो आहे ,अन तू काहीही बोललास तरी माझा निर्णय बदलणार नाही ....
हतबल झालो शेवटी ,मुलीला उचलून घेतले ,खूप शांत झोपली माझ्या खांद्यावर ती ... ती खांद्यावर असे पर्यंत खूप शांत होते मन ..आणि आता
(मुलगी झाल्यावर किती आनंद झाला होता मला ,पण आज गिल्टी फील होत आहे ,अपराधी वाटत आहे ,चुकीची व्याख्या केल्या गेलेल्या अधुनिकरनाची अजून एक बळी पडते आहे,आणि माझी बायकोच नाही मी हि जवाबदार आहे याला ...आई वडिलांना कामगार म्हणून बोलवण्यात आले आहे माझ्या घरी हे हि लक्षात आले ,)

करिअर नावाच्या भिंतीनी जेबनते ते घर नाही दुकान असते,
असो जोवर तुला कळत नाही ,ठीक आहे
असो जोवर तुला कळत नाही ,ठीक आहे
ज्या दिवशी कळेल ,तो पर्यंत खूप उशीर झाला असेल ..
मुलगी आता बॉटेल चे दुध पिते, अन
आज्जीला आई म्हणते..
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)
मुलगी आता बॉटेल चे दुध पिते, अन
आज्जीला आई म्हणते..
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)
No comments:
Post a Comment