आता पहिले सारखा नाही वागत तू ,
(खरेतर तिच्या रागाने मला खूप काही मारून फेकायचा विचार केला असेल ,पण नवरा आहे ,आपल्या संस्कृतीत नाय जमत ,असा विचार करून तिने ते मारलेले सर्व संस्कृतीच्या ढालीने अडविले असेल )

(मी तसाच आहे ग , तू बदललीस ...
आपल्यावर एखादा आरोप झाला कि तो चुकीचा आहे ,हे सिद्ध करण्यापेक्षा ,आपण समोरच्यावर लगेच आरोपांची एक सैनिक तुकडीच पाठवून द्यायची,हि अजून एक आपल्या समाजाची खासियत ...
मी तसाच आहे ग , तू बदललीस ... हे वाक्य म्हणून मी ओठांच्या आतच कैद केले, अन बोललो )

मी दगड नाही ना ग ,बदलणार आहेच न ,आणि प्रत्येकजण बदलतो ,
पहिले पावसात दोघे चिंब भिजायचो ,आता बाहेर असलो आपण आणि पाउस आला कि तू भिजू नये म्हणून कित्येकदा छत्री तुझ्या वर जास्त ठेवली आहे ,
हा बदल का लक्षात नाही येत तुझ्या ,बदल झालेत तुझ्यातही अन माझ्यात ही...
बस जर का काही बदलले नसणार तर तो आपला भूतकाळ ,

म्हणजे काय रे ?
ते नंतर सांगतो ,आधी तू सांग का असे वाटले तुला की पहिले सारखा नाही वागत ?
पहिले किती बोलायचो आपण तासंतास फोनवर ,भेट म्हटले की एका पायावर तयार व्हायचा अन कुठेहि असला तर यायचा , सरप्राईज द्यायचा ,आता असे काही नाही करत तू , बघ ना किती दिवस झाले ,आपण नीट एकमेकांशी बोललो पण नाही ...
ओह्ह तर अशी कम्प्लेन आहे आपली आमच्याविषयी ,ठीक आहे चल बोलू ,
पहिले आपण तासंतास बोलायचो ,बरोबर आहे ,आता आपण इतके बोलत नाही,मान्य आहे ,मी घरी आल्या आल्या कित्येकदा तुला बघूनच समजून जातो कि तुझा मूड कसा आहे ,ठीक आहेस ,खुश आहेस ,उदास आहेस ?हे तू न बोलताच कळते मला ,कमी बोलतो आपण पण त्या बोलण्याला खूप अर्थ असतो ,
आधी फोन केल्या पासून ठेवे पर्यत कितीदा आय लव यू म्हणायचो आपण एकमेकांना ,पण त्यामुळे तुला कळले का त्या आय लव यू या वाक्याची गोडीच घालवली आपण ,हाय हेलो सारखाच आय लव यू झाले ..बरोबर ना ,सवय पडली म्हणायची.... घरात टीवी आणि हातात मोबाईल आल्यापासून आपण विसरलोय की घरात माणसे सुद्धा आहे ...कित्येकदा झाले आहे असे ग मी तुला आवाज दिलाय तर तू टीवी किंवा मोबाईल मध्ये गुंग होतीस ,अन तुला कळले पण नाही ...पण तू टीवी पाहत असताना कितीदा कितीवेळ तरी तुझ्या चेहऱ्यावरचे संमाधान पाहून खुश झालो आहे मी ...
आणि तेंव्हा आपण विद्यार्थी होतो, जवाबदारी नव्हती ,टीवी महत्वाचा नव्हता आणि whatsapp, फेसबुक नव्हते ,मोबाईल तू माझ्यासाठीच वापरायची अन मी तुझ्यासाठी ... आता जवळच्या व्यक्तींशी बोलत नाही आपण,आणि दूरवर असलेल्या व्यक्तींशी बोलण्यात वेळ घालवतो ....बदलली तू पण आहेसच ना ?मी हि बदललो आहेच ...
बर भेट म्हटले कि एका पायावर यायचो कारण तेंव्हा भेटू शकत नव्हतो आपण ,तरसायचो एकमेकांना भेटायला ,पण आता आपण एकमेकांचे झाले आहोत ,दररोज एकमेकांसोबतच असतो ... हा तू माहेरी गेलीस की दोन चार दिवस बरे वाटते नंतर मात्र पहिलेसारखा फोन ,पहिले सारखेच भेटायची ओढ निर्माण होतेच की , अग वेळेनुसार माणूस वागतो ,याचा अर्थ त्याचे तुमच्यावर प्रेम नाहीअसे तर होत नाही न
बर आधी गिफ्ट द्यायचो ,सरप्राईज द्यायचो,मान्य आहे ,आता सहसा असे करायची तू वेळ येवू देतेस का सांग ? शनिवार रविवार आला कि मोठ्या मोल ला जाने आलेच तिथे खरीदी आलीच ,घर चालवायसाठी सेविन्ग्स आल्याच ,पैश्याचा विचार करणे आलाच ,नाही तर वर तूच म्हणतेस की किती उधळतो तू पैसे ...हं एखाद्यावेळेस आणायला हवे मी काही ,
पण आधी फक्त मी जरी तुझ्यासमोर आलो तरी किती आनंदी व्हायचीस ना तू? आता ती जागा गिफ्ट ने घेतलीय बघ ...बदलली तू पण आहेस मी तर बदललो आहेच ...

आपण एकमेकांशी नीट बोललोच नाही किती दिवस झाले ,मान्य आहे हा तुझा आरोप पण ,'आपण'! एकमेकांशी नाही बोललो आहे .. मी एकटाच नाही बोलत असे काही आहे का ?बघ ना आज तू बोललीस कि तू बदलला आणि किती बोलत बसलो आपण ,पण त्यातही तू मिनिटा मिनिटा ला मोबाईल whatsapp चेक करतच आहेस ना ,न धड इकडे लक्ष ना धड तिकडे ...मी हात तरी लावला का मोबाईल ला ?
(तिने रागात मोबाईल फेकला अन बोलली )
तुला घाबरतात सर्व ,कधी काय बोलशील म्हणून,, कोणी काही बोलत नाही तुझ्याशी जास्त ,म्हणून नाही लावला तू हात ...

हा हा ,,मोबाईल चेक केला फुटला नव्हता ,तिला जवळ घेतले अन बोललो बघ एक गिफ्ट भेटले असते ,मोबाईल जर जोरात फेकला असता तर ,
(ती अजून चिडली )
मी हाताने चेहरा वर केला डोळ्यात पाहिले अन आय लव यू म्हटले ,
पुष्कळ लाजली ,अन मिठीत शिरली ..

मी हळूच बोललो बघ इतके दिवस नाही बोललो आय लव यू ,अन आज बोललो तर किती आंनंद झाला तुला, ' आय लव यू ' या वाक्याला ही आता कि अर्थ मिळाला बघ ...
माझ्या छातीवर दोन प्रेमळ गुद्दे मारले तिने अन म्हटली असेच बोलत जाऊ न दररोज आपण ..
मी म्हटले ,बोलू की पण एक करावे लागेल ,
ती, काय करायचे सांग
पहिले हा टीवी अन मोबाईल olx वर विकू आणि त्या वेळी जो मोबाईल होता आपल्याकडे नोकिया १३०० घेवू ..बघ दररोज आपण किती बोलणार मग एकमेकांशी ...
ती जरा विचारात पडली ,मग विषय बदलत म्हटली ,
अरे या शनिवारी सिंहगड ला जायचे का ?
अरे या शनिवारी सिंहगड ला जायचे का ?
मी बोललो, पहिले सारखी नाही वागत आता तू
नि:शब्द(देव)
नि:शब्द(देव)
No comments:
Post a Comment