Monday, June 13, 2016

अपेक्षाभंग....



(रविवार म्हटले कि शनिवारी रात्री जागायचे ३, 4 वाजेपर्यंत रविवारी उशिरा उठायचे ,इतके एक धोरण मी आजवर पाळू शकलो आहे ,तर १२.४७ ला उठलो ,पाकिस्तान वर हल्ला केला ,रात्रभर तोंडात आश्रय घेतलेल्या किड्यांना बेसिन मध्ये टाकून ,अंगावर पाणी ओतून ,गरजेच्या ठिकाणी साबण चोळून ,अंगाला पवित्र केले ...मोबाईल पाहिले मित्राचा मिस कॉल(मोबाईल सायलेंट असतो माझा नेहमी ).. फोन लावला )
काय बे ,
ये टपरीवर चहा घेवू ..
आलोच ...(पोहचलो ,तो चहा सोबत सिगरेट हे ठरलेले असते ,आज त्याचा चेहरा जरा उदास वाटला )
कावून बे काय झालंय,
एक असेन तर सांगू बे ,साला झंड झाली हाय जिंदगी ,
एक काम कर एक एक सांग ,बोलू त्यावर
काय नाय बे आपण कितीही चांगले राहिलो तरी साले लोक मारतातच आपली ,
कोण मारली तुयी आता
काय नाय बे घरचे म्याटर आहे जास्त बोलू शकत नाही ,
बर (आमच्यात एक आहे घरी कितीही प्रोब्लेम असले तरी खुल्लम खुलला बोलत नाही ,घरच्यांचा आदर एकमेकांच्या नजरेत टिकवून ठेवतो,पण कितीही चांगले वागले तरी ,त्याच्या या वाक्याने लक्षात आले ,अपेक्षा भंग चा म्याटर दिसतोय ,बोललो मग ,फंडे मारायची सवय आपल्याला )
ये भाई गरम दे ,और एक चाय दे फिरसे ,
बर ऐक ,जगात प्रत्येक व्यक्ती हा खुश राहायचा प्रयत्नात असतो ,अन प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असते ,तो स्वत:ला आनंदी ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो ,आणि कधी कधी जेंव्हा दोन लोकांचे आनंद एकमेकांसमोर येतात तेंव्हा कुणाच्या तरी आनंदावर विरजण पडते ,तिथे अपेक्षाभंग होतो ....
(त्याने आत ओढलेला धुआ ,अन शब्द ,नवरा बायको सारखे त्यांच्या तोंडातून बाहेर पडले )
म्हणजे ? मला काय कळले नाय काय बोलतोय ...
(तो बोलताना मी आपला आत ओढला होता धुआ ,सो सोडताना कॉलर टाईट करूनच निघला),
बर हे बघ तू बोललास ना कितीही चांगले वागले तरी लोक मारतातच आपली ,आपण चांगले वागलो असे आपल्याला वाटत असते ,पण दुसऱ्यांना तसेच वाटेल असे नसते ,आणि आपण चांगले वागलो ,म्हणून समोरच्याकडून काही अपेक्षा ठेवतो ,कि त्याने आपल्यासोबत असे वागावे तसे वागावे ....पण तो आपल्याला वाटेल तसे का वागणार ना ,त्याला त्याची विचारशक्ती आहे ,त्याच्या जवाबदार्या आहेत ,आवडनिवड आहे ,तो त्याला हवे तसेच वागेल ,तेंव्हाच तो आनंदी राहू शकेल ,आणि तो तसा वागला की आपला भ्रम तुटतो कारण आपण विचार केला असतो कि त्याने माझ्यासोबत अमुक अमुक पद्धतीने वागावे ....खरेतर वाईट तो तसा वागला याचे वाटत नाही आपल्याला ,आपल्याला हवा तसा तो वागला नाही याचे वाटत असते ...
आणि जगात चांगले वाईट असे काही नसते रे ,खूप पुसट शी रेषा आहे चांगल्या अन वाईट मध्ये ...व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असणारच ,जनरली ना आपण जे हि नाते जोडतो किंवा जोडल्या गेलेली नाती असतील (रक्ताची ) ही सर्व नाती ,एकाच धोरणावर चालत असतात ,तो म्हणजे स्वार्थ(आणि हे आपल्याला ही कळत नसते ) ...जिथे आपल्या स्वार्थावर गदा येते तिथे त्या नात्यात दरार पडली बघ ....
आई बायकोत पिसल्या जात आहे रे ....
(मी बोललो ते त्याला कळले हे मला कळले ,अन लक्षात आले सिगरेट संपत आली आहे ,चहा थंड झाला आहे ,गरम करायला दिला ,अन एक सिगरेट परत मागवली )
मित्रा आपले जम्मू कश्मीर सारखे झाले आहे ,आई भारत अन बायको पाकिस्तान ,किंवा आई पाकिस्तान अन बायको भारत किंवा कधी कधी तर आई अन बायको दोन्ही पाकिस्तान ....
कळतच नाय रे कसे वागू ,
हा हा ,बरोबर ,हे बघ हे न उलगडणारे कोडे आहे ,इथे साक्षात देव बी आला तरी काही करू शकत नाही ...त्या दोघीच करू शकतात काय ते ,बायको ला वाटत असते मी इतकी चांगली वागते तरी सासू असे करते ,अन सासू ला वाटते कि मी इतकी चांगली वागते तरी सून असे करते ,
अन तुला वाटते तू इतका चांगला वागतो तरी त्या दोघी अश्या करतात ...
बघ न किती गम्मत आहे ,आता तूच संग चांगले नेमके कोण वागते ?
सर्वांचा आनंद जेंव्हा एकमेकांसमोर येतो तेंव्हा तलवारी उपसल्या जातात ,आणि लढाई चालू होते यात मुलाचा आनंद बेमोत मारल्या जातो ,कारण समोर लढणार्या दोन्ही त्याचेच असतात ....मात्र त्या दोघांचे आनंद काही मानत नाही ...
काय करावे मग ...
यावर हे सोलूषण आहे कि नाही माहित नाही ,पण एक कर आजपासून जेंव्हाही घरी जाशील ,त्यांच्यात काहीही वाद होऊ दे लक्षच नाय द्यायचे ,घरी पोहचला कि बायको वर पण चिडचिड करायची अन आईवर पण चिडचिड करायची ,ताटावर बसले की जेवणावरून चिडचिड करायची ,रागात उठायचे ,बाहेर निघून जायचे ,एक प्याक मारायचा मस्त ,दाबून जेवायचे ,अन घरी जायचे ....त्या दोघी एकत्र होतात कि नाही बघ मग ,तुझी काळजी घेणे सुरु करतील एकमेकांशी न भांडता ..
जेंव्हा काही प्रोब्लेम सुटत नसतात ,तेंव्हा आपण एक स्वत: नवीन प्रोब्लेम क्रियेट करायचा ...मग त्यावरच त्या दोघी खेळत बसतील ,
अमेरिके कडून शिक बे काही ...
हव साला असेच करतो आता ,पण तरीही नाही बदलले काही तर ,
मी हाय ना काड्या लावायला :p :p
हा हा ,असो कधी कधी सर्वांच्या भल्यासाठी करावे लागते रे ,आपल्याला काय त्या दोघी आनंदी असल्या की बस ....
हम्म ....
चल एक प्याक मारून येवू .....
(साला तो हे बोलताच कळले ,दारू पिण्यासाठी जसे काहीही कारण वापरू शकतो ,तसे सुखी राहण्यासाठी शोधू शकलो असतो तर ?...डोक्यात आले ,आता पिताना मारतो यावर फंडे असा विचार केला अन बोललो )
चल ...घरी सांगतो गाडी पंक्चर झाली आहे ...
नाहीतर आईला टेन्शन येयील ...
सिगरेट फेकली ,अन पायांखाली चिरडली परत ,
कित्येक आयुष्य तसेच आई बायकोच्या भांडणात चिरडल्या जात असतील नाही का ?
असो ,
चलता है ,जिंदगी है ,असे म्हणायचे
अन जगायचे ...
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

No comments:

Post a Comment