तिने विचारले ,
किती प्रेम करतोस माझ्यावर ?
किती प्रेम करतोस माझ्यावर ?
तसा तिचा नेहमीचा प्रश्न ,का करतोस माझ्यावर इतके प्रेम ?(खरतर मलाही माहित नव्हते की का करतो ),पण जेंव्हाही मला ती हा प्रश्न विचारते ,या प्रश्नासोबत ,'मी तिचे कौतुक करावे' हा मुद्दा माझ्या कानात शिरतो ,आणि मग मी कधी तिच्या डोळ्यांवर ,कधी स्वभावावर ,कधी सुंदरतेवर बोलून,मी तिचे कौतुक करावे' या मुद्द्याचे पोट भरत असतो ... माझ्या उत्तरावर नेहमीच तिची प्रतिक्रिया ,'चल काहीपण का , इतकीही चांगली नाही हं मी' इतक्या अफाट लाजाळू पद्धतीने ती बोलते हे वाक्य की ,तिच्या पेक्षा जास्त तिच्या लाजण्यावर प्रेम येते ...
तिच्या याच लाजण्याला कित्येकदा मी ,माझ्या उदास अवस्थेत माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवताना पाहिले आहे ,आई फिरवायची कधी काळी अगदी तसा ,जीवनाच्या शर्यतीत धावत असताना अनेकदा पडलोय आणि प्रत्येक वेळेस तिच्या स्वभावाने हात धरून मला उठवले आहे ,रात्री पापण्या मिटल्यावर कित्येकदा तिच्या डोळ्यांनी मला स्वप्नाच्या जगात नेलंय ,हसवलं आहे जगवलं आहे ,

'चल काहीपण का , इतकीही चांगली नाही हं मी' ती अशी बोलली की मी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिची मान हालवतो ,आणि कपाळावर छानसा एक कीस करतो , ती मग लगेच मिठी मारते ,त्या मिठीत जाणवते की ती माझ्यात तिच्या बापाला शोधतेय कुठेतरी ....छान जगतो आम्ही ,हसणे ,बोलणे,भांडण ,रुसणे ,जसे सर्वांचे तसेच आमचे ..
पण आज,तिने विचारले ,
किती प्रेम करतोस माझ्यावर ?आणि मिठी मारली , रडत होती ती ,प्रश्न बदलला होता ,आवाज बदलला होता ,(तिने मारलेल्या मिठीने हळूच माझ्या कानात सांगितले की आई वडिलांनी मुलगा पाहिलाय ,चांगला आहे, हिची हिम्मत कुपोषित झालीय आई बापाच्या प्रेमामुळे,..मला सारे लक्षात आले ,)
तिने मात्र काहीही सांगितले नाही ,तिला त्रास होत होता कि, मला तिने फसविले असे मला वाटेल याचा ,मी तिचा चेहरा हातात धरला , तिच्या पडणार्या प्रत्येक अश्रू सकट आमचे प्रेम मला धुळीत पडताना दिसत होते ,रडू दिले मी तिला मनसोक्त ,शांत राहिलो ...मग तिचे रडणे थांबले ,तिने डोळे पुसले तिचे हि अन माझे ही,

तिने पुन्हा विचारले
किती प्रेम करतोस माझ्यावर ?मी बोललो ,
"तू सुखी रहावीस यासाठी तुझ्यापासून दूर जाईल इतके ..."
परत रडायला लागली ,आणि तिने मिठी मारली ..
आज त्या मिठीत मला जाणवले की ती तिच्या वडिलांना मिठी मारत आहे ,
तिला बोललो, कधी कधी दोन चांगले व्यक्ती सोबत चांगले जीवन नाही जगू शकत ,आपले नाते मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात ठेव आणि लॉक करून टाक त्या कप्प्याला ,आणि आता दुसरा कप्पा उघड आणि आयुष्याला जागा दे नव्याने ,पण एक मात्र कर आपले नाते ज्या कप्प्यात ठेवशील तिथे डांबर गोळी ठेव,आपल्या नात्याने नेहमीच तुझ्या आयुष्यात सुगंध पसरवत राहावा ,

तुला राग नाही का येत आहे माझा ? अग राग कशाला येयील ,तू नेहमी मला विचारायची ना, कि का करतोस प्रेम माझ्यवर ?मला आज कळले कि का करतो प्रेम तुझ्यावर, तिने विचारले ,का ?मी बोललो कारण तुला प्रेम म्हणजे काय हे कळले आहे , ती म्हणाली कसे ?
प्रेम हे प्रेम असते ग ,तुझे तुझ्या आईवडिलांवर चे,भावा वरचे आणि माझ्यावरचे सर्व सारखे असते ,फक्त आपण त्या प्रेमाला वेगवेगळे आयाम देतो नात्यानुसार ,
आणि एका प्रेमासाठी दुसऱ्या प्रेमाला दुखावणे योग्य नाही ...तू तुझ्या आईवडिलांच्या प्रेमाला माझ्यासाठी दुखावले नाहीस ,हे आवडले मला ...ती म्हटली पण तुझ्या प्रेमाला दुखावले त्याचे काय रे? मी हसत म्हटले माझे प्रेम माझ्यावरच गेलेय गं,समजूतदार आहे ,ती हि हसली जराशी ...चल निघायला हवे आता,आपापले आयुष्य वाट पाहत असेल आपली ,

ए काय करशील तू आता एवढे सांगून जा ना ? मी म्हटले बहुधा कविता करेल ,बघू तू नाही भेटलीस , ती तरी भेटते का ? एका युगाचे मनात दु:ख लपवून ,हसऱ्या चेहर्याने दोघानीही ,प्रेमाला बाय म्हटले ....
बस बाकी काही नाही .
बस बाकी काही नाही .
नि:शब्द(देव)
No comments:
Post a Comment