Thursday, June 9, 2016

'आ' रक्षण

'आ' रक्षण

तू नेहमी आरक्षणाला विरोध करताना दिसतो ,नेमका प्रोब्लेम काय आहे तुझा ,तुला माहिताय का आपल्यावर किती अन्याय झालाय तो ? किती सोसले आहे आपण ,काय काय करवले आहे या लोकांनी आपल्याकडून ,नेहमी पायाशी दाबून ठेवले आहे ,
(हे कधी झाले तेंव्हा मी जिवंत नव्हतो ,आणि भूतकाळ उकरूनउकरून भविष्याची सोय करणे हे कधी तत्वात बसलेच नाही माझ्या )

मी बोललो ,प्रोब्लेम खूप आहेत ग, पण तू त्या आधी संग तुला आरक्षण का हवे असते वाटते ?

बोलले की किती त्रास दिला आहे आपल्याला ,किती सोसले आहे आपण ? आणि लहान जातीच्या लोकांनी वर जाउच नाही का ?

का नाही ?सर्वांनी वर जावे ,सर्वांचा विकास व्हावा ,पण कुणाच्या घरची भाकर चोरून आपले पोट भरू नये इतकेच माझे म्हणणे ..

चोरून ? आम्ही चोरून नाही आमच्या हक्काची भाकर खात आहोत ..

हक्काची ?असो चल बोलू यावर आता ,हे बघ आरक्षण ज्या काळात दिले गेले ती त्या काळाची गरज होती ,तू म्हणते आहेस तसे व्हायचे आधी ,जात पात धर्म या गोष्टीना जास्त म्हह्त्व होते ,आणि छोट्या जातीवले लोक हे फार गरीबअसायचे त्यांना खाण्या पिण्याचेही वांदे असायचे ,म्हणून त्या काळात आरक्षण देणे गरजेचे होते ,पण आता तशी स्थिती नाही उरली ,अन माझा आरक्षणाला विरोध नाहीच मुळात ,इतकेच म्हणणे आहे की आर्थिक मोजपट्टीवर जर आरक्षण दिले तर काय वाईट आहे ,तू जसे म्हणते आहेस तसे जर छोट्या जातीतला कुणी असेल तर त्याला नक्कीच मिळेल ना आर्थिक दृष्ट्या जरी आरक्षण हा निकष लावला तर ...
पण जेछोट्या जातीचे आहेत पणआरक्षणाचा फायदा घेवून आज काही बनले आहेत ,ज्यांच्याकडे आज बक्कळ पैसा आहे ,त्यांना काय गरज आहे आरक्षणाची ?ते त्यांच्या मुलांना ते सर्व काही देवू शकतात जे मोठ्या जातीतले लोक देतात ...अश्या लोकांनी आरक्षण का घ्यावे ? आणि तुला कळते का ग ,देशाचा किती पैसा अश्या लोकांवर खर्च होतोय ज्यांना गरज नसताना ही फक्त जातीचे आहेत म्हणून आरक्षण हवे असते ...तो पैसा शेवटी इथल्या प्रत्येकाच्याच खिश्यातून जातोय ना ,आणि हे लोक जे सक्षम असतानाही आरक्षण घेतात् म्हणजे त्यांच्याच जातीतल्या एखाद्या गरीब गरजूला आरक्षण मिळत नाही ,इतके साधी गणित का लक्षात येत नाही तुझ्या , इतकाच पुळका आहे ना मग हेलोक आरक्षण घेणे बंद का करत नाहीत ? आता हे सक्षम असणारे लोक त्यांच्याच जातीतल्या लोकांवर अन्याय करीत आहेत असे नाही वाटत का तुला ?हक्काची भाकर म्हणे ...आर्थिक दृष्ट्या आरक्षण हा जर निकष लावला तर छोट्या जातीतले गरजू आणि गरीब यांना फायदा होईलच पण त्याच बरोबर ,देशातल्या सर्व गरजू लोकांना समोर येण्याची संधी मिळेल ,आणि तेंव्हा कुठे खरा विकास होईल ....आणि आरक्षण विषय यावर काही बोलले की लगेच बाबासाहेबांचे नाव घेवून विशिष्ठ जातीचे विरोध करायला तयार आहेतच की ....ज्यांना बाबासाहेब कधी कळलेच नाही आणि एका थोर नेत्याला स्वार्थासाठी फक्त दलितांचा नेता इतकेच बनवून ठेवले यांनी ,यांना काय माहित बाबासाहेब हे फक्त दलितांचे नाही त्या पल्ल्याड खूप मोठेव्यक्तिमत्व होते ...पण स्वार्थ आणी राजकारण्याच्या हातचे खेळणे झालेला समाज कधी बदलू देणार नाही हे चित्र ....आपल्याला ना लढायचे नाहीच आहे मुळात हा मोठा प्रोब्लेम आहे आपला ,सर्व कसे आयते आणि कमी कष्टात मिळावे ,
बाबासाहेब स्वत: लढले ,त्यांच्याकडून लढावू पणा घ्यायला हवा होता ,त्यांच्याकडून अन्याया विरुद्ध उभे राहणे हे घ्यायला हवे होते ,पण आपण हे कसे घेणार ना ,आपण त्यांच्याकडून फक्त एक घेतले आरक्षण कारण तितकेच आपल्या फायद्याचे होते ...स्वार्थी साले सगळे ,देशाचे वाटोळे करायला निघालेत ,जात जात म्हणून ....

तू काहीही म्हण पण आरक्षण पाहिजेच उद्या महिलांच्या आरक्षणावर ही बोट उचलशील तू ,तुझे काय

हो का नाही ,अरे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतोय आम्ही असे जेंव्हा म्हणता,तेंव्हा तुम्ही स्वत: मान्य करता ना पुरुष हा श्रेष्ठ आहे ,कारण नेहमी श्रेष्ठ गोष्टींशीच तुलना करतो आपण आपली ...तुम्हाला आम्ही कधीच छोटे समजलो नाही ,तुम्हीच पुरुषांना शत्रू समजायला लागलात ,प्रोब्लेम्स आहेत ना मान्य आहे ,पण ते प्रोब्लेम पुरुशांमुळे नाही तुमच्याच लोकामुळे आहेत ...तुम्हाला लढायचे नसते , तुम्ही स्त्री म्हणून जन्म घेत नसता माणूस म्हणून जन्म घेता ,आणि स्त्री तुम्ही बनत जाता ,का बनता ना स्त्री ? का नाही लहानपणापासून तुझ्या मुलीला तू मुलासारखे खेळू देत ,का नाही तिच्यावरही जवाबदार्या टाकत जश्या मुलांवर टाकल्या जातात ,का नाही लग्न झाल्यावरही ,तुझ्या आईवडिलांचा सांभाळ करत ,कारण तुम्हाला हे नकोय तुम्ही मान्य केलेय की आम्हाला असेच जगायचे आहे ,हा मोठा प्रोब्लेम आहे ,फक्त प्रोफेशनल मोठ्या मोठ्या पदावर येताय म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून चालतंय असे जेंव्हा म्हणता न हसायला येते तुमच्यावर ,आणि त्यात ही आरक्षण हवेच त्याच्यामुळे ,स्वाती संतोष महाडिक बद्दल लिहिले होते मी वाचले का ? नवरा शहीद झाला तरी खचली नाही हि बाई लढली आणि स्वत:ही भारती झाली सैन्यात ,तुम्ही लढू शकत नाही असे नाही आहे ,तुम्हाला लढायचे नाही हा मुद्दा आहे ....'आ' रक्षण या कुबड्या आहेत ज्या धडधाकड माणसाला अपंग करतात ,तो आपल्या क्षमतेप्रमाणे वागायचे करायचे विसरूनच जातो ,असो मला माहिती आहे हे बदलणार नाही ,पण कमीत कमी मी तरी माझ्या विचारांवर चालेल आणि माझ्या मुलीला एका माणसासारखे जगवेल मुलगी मुलगा,जात धर्म यापल्ल्याड,आयुष्य हे हसत खेळत लढत पडत उठत जगायचे नाव आहे हे शिकवेल तिला ...

हो का ? बघू तसेही तुझ्या सारख्यामुळे आपल्या जातीचे लोक मागे आहेत ....

आपल्या जातीचे ? हा हा जात ही त्या काळात जो जे काम करायचा त्यावरून ठरवण्यात आली होती ,आज मी तुझ्या जातीचा नाही , शिक्षक या जातीचा आहे ,
त्यामुळे आपली जात वगेरे या भानगडीत नको पडू ...

बर ह, आम्ही मात्र आरक्षण घेणारच ,जे करायचे ते कर तू ....(तनतन करत निघून गेली ती )
मी हसत बोललो
'आ' रक्षण कर रे बाबा देशाचे
बस बाकी काही नाही ..

नि:शब्द(देव)



No comments:

Post a Comment