Saturday, June 11, 2016

प्रेम एकदाच होते म्हणे ? हो का .......असेल बा

प्रेम एकदाच होते म्हणे ? 
हो का .......असेल बा
*****************************************************
मोबाईल ची रिंग वाजली ,माझी रिंगटोन (अजीब दास्ता है ये ) मला फार आवडते ,त्यामुळे सहसा मी फोन रिसीव नाही करत ,फोन कुठेतरी पडलेला असतो ,रिंग संपली ,परत रिंग वाजली ,म्हटले कोण तरी गरजू दिसतोय ,बघितले तर सख्या मित्राचा फोन ,उचलला मी ,अन बोललो कारे चोम्न्या काय बोलतो
(तिकडून पगार न झाल्यावर जी अवस्था होते ,त्या अवस्थेत निघणार्या आवाजात तो बोलला)
नवश्री वर बसलोय दोन तास झाले ,चढली आहे ,ये लवकर ,कळत नाही आहे काय होऊन राहिले ...
साल्या ,थांब आलोच ....
(नाशिबाला लात मारतो तशी ,गाडीला किक मारली आणि पोहचलो टेबलवर ,
हातात सिगरेट होती त्याच्या ,घेतली अन एक कश मारत बोललो )
आता कशावरून भांडण झाले तुमच्या दोघात ?(तो प्यायला या एकाच कारणाने बसायचा ,आणि नेहमी असाच फोन यायचा मला ,म्हणून कारण माहित होते )
संपले बे देव्या सारे , संपले (*वेटर त्याच्या ग्लास मध्ये ज्या पद्धतीने दारू ओतत होता त्याच पद्धतीने त्याला झालेला त्रास, त्याच्या डोळ्यात अश्रू ओतत होता बहुतेक* )
ब्रेकअप झाले ...सब झूठ है साला ,HELL WITH THIS FUCKING LIFE ..
(त्याच्या हातात सिगरेट देत बोललो ) घे सिगरेट घे ,अन सांग काय झाले शांत पने ,काहीतरी मार्ग काढू आपण ....
तिला मी नकोसा झालोय ,तिला दुसरा कोणी आवडायला लागला आहे ,तिने तसे सांगितले नाही पण कळते रे प्रेम करतो तिच्यावर ,पण असे कसे यार,, मला ती सोडून दुसरे कोणीच आवडत नाही ,प्रेम एकदा होते रे फक्त ,तिचे माझ्यावर प्रेम नव्हतेच साला टाईमपास करत होती साली माझ्यासोबत ,(अन रागात मोबाईल उचलून काहीतरी टाईप करायला लागला ,माझ्या लक्षात आले ,मी मोबाईल हिसकावून घेतला अन बोललो )
तू तिला काही मेसेज पाठवणार नाही आहेस ,आपले बोलणे झाल्याशिवाय ,
खतम हो गया रे देव्या सब ,खतम हो गया (उधारीत बियाणे आणून मोठ्या आशेने पेरल्यानंतर अवकाळी पावसाने सारी नासाडी केली ,की शेतकऱ्याची जी हालत होते ,तशी काही त्याची झाली होती )
इकडे बघ,साल्या इकडे बघ म्हटले ना ,(एक घोट घेतला या दोन वाक्याच्या मधात ) ,बर चल बोलू यावर ,ऐक काय म्हणतोय मी ,मग तुला जे मेसेज करायचे ,जी आई घालायची घाल ,पहिले ऐक फक्त माझे ...
चल पकडू कि तिचे दुसऱ्या कुणावर तरी प्रेम झाले असेल ,
(इतके बोलत नाही मी कि लगेच ,तोंडाजवळ आणलेला ग्लास आपटत बोलला )
पकडू नाही आहेच ,साली हरामी ,खतम हो गया रे देव्या सब खतम,
ऐकना भोसडीच्या काय म्हणतोय ,नाहीतर जातो उठून (इतके बोलल्यावर मात्र ऐकायच्या मूड मध्ये मजबुरीत का होईना आला असावा )
तर चल तिचे दुसऱ्या कुणावर प्रेम आहे आता ,आणि जिंदगी आहे रे दुनियेत खूप चांगली लोक आहेत ..आपण आपल्याला जेवढी लोक भेटतात ,त्यातली ,आपल्या स्टेटस ला आपल्या अपेक्षांना पूर्ण होणारी कोणी दिसली की तिच्या प्रेमात पडतो ,कधी ऐकलेस का आपल्या कुठल्या मित्राला भिकारीवर प्रेम झालंय वगेरे ? नाही ना ,आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या ,आपल्या अपेक्षेनुसार पात्र ठरणाऱ्या पोरीच्या प्रेमात पडतो ,स्वार्थी प्रेम असते रेसार्यांचे ,अपेक्षा म्हणशील तर कुणाची सुंदरता असते ,कुणाची समजून घेणारी ,कुणाची काय अन कुणाची काय ...त्यानंतर प्रेमप्रकरण चालू ,त्यांनतर हि बरीचशी मंडळी भेटत जातात ,त्यात हि खूप चांगली लोक असतात ,त्यातले ही कुणी आपल्याला आवडायला लागते ,आणि हे साहजिक आहे रे आपण माणूस आहोत ,आताअश्यावेळी दुसरा कोणी आवडायला लागला तर दोन पर्याय असतात ,
१. एकतर मनात दाबून ठेवणे (आपल्या समजात एकासोबत असताना ,दुसर्याशी नाते जोडू नये या नात्यात असा अलिखित नियम आहे आणि त्या नियमात अडकले जातात काही )पण मनात दाबून ठेवले तर याचा अर्थ काय, ती मानसिक दृष्ट्या जेंव्हा त्याची झाली ,तेंव्हा ते नाते जोडल्या गेलेच ना ? बस ती सांगत नाही ,आणि ते नाते समोर नेत नाही म्हणजे ती प्रामाणिक का ? नाही मला नाही वाटत असे ,तिचे शरीर राहते तुमच्याकडे बस अश्या वेळेस तिचे मन नाही ? आणि शारीरिक प्रामाणिकता हीच श्रेष्ठ प्रामाणिकता असे आपल्या समाजात गोंदवल्या गेले आहे ,उलट एकदा सेक्स केला कि दुसरा दिवशी साला झ्याट काही गंध हि उरत नाही त्याचा ,पण त्याला आपण महत्व देणार ,पण मानसिक दृष्ट्या कुणाची झाली ती ,तर जन्मभर ती सल तिच्या मनात राहील ,न ती सुखी असेल न तू ...राहिले
दुसरा पर्याय
२. सांगून मोकळे होणे ...इथे खरी प्रामाणिकता येते ,तिला तो आवडायला लागला आहे ,माणूस आहे आवडू शकते ,आणि जर तिला वाटत असेल की त्याच्यासोबत ती तिची जिंदगी खुशीत काढू शकते ,तर मग हा तिचा निर्णय ,तिच्या जीवनाचे निर्णय घ्यायला ती मोकळी असते ,तुला एकच मित्र आहे का ,तुला खूप मित्र आहेत ना तसे प्रेम ही खूप जणांवर होऊ शकते ,फक्त मैत्रीत आणि प्रेमात एकच फरक ,शारीरिक बंधन ...
ऐकतोय का कि चढली लै?
बोल ऐकतोय ,(त्याच्या लक्षात आले खूप वेळचा त्याने प्याक मारला नव्हता ,ग्लास उचलून प्याक मारत बोलला बोल )
तर हे बघ ,तिला वाटत असेल ना ती त्याच्यासोबत खुश राहू शकते ,जाऊदे ना यार तिला ,आणि तू तिच्यावर प्रेम करतो ना ? मग ती खुश राहणे म्हत्वाचे की तुझी होऊन राहणे म्हत्वाचे ) आणी ती जर फसवणारी मुलगी असलीच ,तरी बरे ना जाऊ दे जाईल तिच्या कर्माने एकदिवस ...तू कशाला त्रास करून घेतोय ,ती खुश तो मै खुश बोलनेका ,भोकात गेली दुनियादारी ,लागायचे आपल्या कामाला ...
देव्या बोलने सोप्पे आहे रे ,१४ वर्ष होऊन गेले तू त्या ११ वी वालीला विसरलास का ?
नाही विसरलो खरे आहे ,पण जेंव्हाही तिची आठवण येते ,मला त्रास होत नाही मला आनंद होतो ,मी एन्जोय करतो तिची आठवण पण...बघ ना आता मी गोव्याला गेलो होतो ,मला गोवा खूप आवडला ,धमाल केली ,येताना जरा वाईट वाटले ,पण आता मला गोव्याची आठवण आली तर मी हट्ट धरतो का गोव्यालाच सेटल व्हायचे म्हणून ? मी फोटो पाहून आनंदी होतो ...तसेच नात्यांचे असते रे तुम्ही सोबत घालवलेल्या क्षणांना आठवून एन्जोय कर ,संपले संपले म्हणून काय रडत बसतो ,उठ साल्या आम्हाले काय किंमत आहे का नाही ,आणि कधी कधी दोन चांगले व्यक्ती एक चांगले आयुष्य नाही जगु शकत सोबत ...सोड
(त्याच्या चेहर्यावरून तरी वाटत होते पटले त्याला )
हव साला खड्ड्यात गेले सर्व ,काय बिघडत नाही, गेली त गेली बरे झाले आता गेली ,लग्न झाल्यावर गेली असती तर आयुष्य उध्वस्त झाले असते (जरा आवजात जोर दिसत होता त्याच्या ,ओरडला... वेटर एक ब्लेंडर्स आणि दोन गरम रिपिट)
अबे किती पेशील चल घरी आता ,
नाही बे एक प्रश्नाच उत्तर दे ?
मी बोललो,आता काय अजून
ते तू गोव्याचा बोलला ना ,मस्त बोलला यार ,बम बाता मारता तू ,पर एक चीज बता,गोव्याले सेटल व्हायचा हट्ट नाय पकडत आपण ,हे बरोबर आहे ,पण वाटले तेंव्हा परत गोव्याला जाऊ शकतो ना ?मग नात्याचे काय ?
(एवढी पिल्यानंतर माणूस हुशार होतो याचा प्रत्यय आला मला )मायला ,मला वाटले तुला चढली ,
(अन मग तो कधी आणि किती पिला याच्या गप्पा मारत बसला ,त्याच्या प्रश्नांचे उत्तर माझ्याकडे नव्हते ,आणि त्याला ही माहित असावे ,म्हणून त्यानेही नंतर विचारले नाही )
अबे अपनेको चढती क्या कभी दोस्त ?
एक काम कर पैसे नाही आहे देव्या आज,तू दे बिल, उद्या देतो तुले ..
(हे ऐकून माझा प्रेमभंग झाल्यासारखे वाटले मला ,बिल मीच देणार मग कायले झोल आता )
मी पण बोललो ,वेटर ९० लेके आ एक ,और एक गरम
बस बाकी काही नाही
नि:शब्द(देव)

3 comments: